कथित पर्यावरणप्रेमी मेधा पाटकर यांच्या संस्थेला कोट्यवधी रुपयांची अवैध देणगी मिळण्याचे आरोप !

१७ वर्षे एखाद्या संस्थेचा अपव्यवहार उजेडात येऊ न शकणे अथवा समोर येऊ दिला न जाणे, हे गंभीर आहे ! यासाठी उत्तरदायी असलेल्या सरकारी संस्थांच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक घरातील ४० चुलींची अज्ञातांकडून तोडफोड !

ओडिशामधील बिजू जनता दल सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून सत्य हिंदूंसमोर आणणे आवश्यक !

अमेरिकी डॉलरचे जागतिक स्तरावरील वर्चस्व धोक्यात ! – अमेरिकी बँक

ज्याप्रकारे गेल्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटनच्या पाऊंडवरील जगाचा विश्‍वास अल्प होऊन त्याची जागा अमेरिकी डॉलरने घेतली, त्याप्रकारे आता अमेरिकी डॉलरची स्थिती होण्याची चिन्हे आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसारित केलेल्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरला दाखवले पाकिस्तानात !

भारताचा अविभाज्य भाग असलेला पाकव्याप्त काश्मीर पाकमध्ये दाखवून भारतियांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या अशा प्रसारमाध्यमांवर सरकार काय कारवाई करणार ?

गोरखनाथ मंदिरावर जिहाद्याकडून कोयत्याद्वारे आक्रमण !

एका जिहाद्याला पकडण्यासाठी १ घंटा वेळ घेणारे पोलीस सशस्त्र जिहादी आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ?

चीनमधील २.६ कोटी शांघायवासियांची कोरोना चाचणी होणार !

चिनी सरकारच्या ‘डायनॅमिक झीरो पॉलिसी’ म्हणजे परिस्थितीनुरूप कोरोनाला पूर्ण पायबंद करण्याच्या धोरणामुळे अनेक प्रांतांमध्ये दळणवळण बंदी कठोरतेने राबवली जात आहे.

हिजाब घालणार्‍या शिक्षिकेला परीक्षेच्या वेळी ‘पर्यवेक्षिका’ नेमण्यात येणार नाही !  

म्हैसुरू जिल्ह्यात एका शिक्षिकेने  हिजाब घालूनच कामावर येण्याचा हट्ट केल्यामुळे तिला पर्यवेक्षिकेच्या दायित्वातून मुक्त करण्यात आले होते.

उत्तरप्रदेशमध्ये ७ सहस्र ४४२ मदरशांची चौकशी होणार !

मदरशांच्या आधुनिकीकरणावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र त्याची फलनिष्पत्ती काय ? त्यात मदरशांना मिळणारे पैसे लाटले जात असल्याचेही पुढे येत आहे. हे सर्व प्रकार पहाता मदरशांना टाळे ठोका !

मशिदींवर भोंगे लावले, तर मंदिरावर दुप्पट आवाजात ‘हनुमान चालीसा’ लावा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

कोणत्या धर्मात लिहिले आहे की, मशिदींवर भोंगे लावा ? जेव्हा धर्म लिहिला गेला, तेव्हा भोंगे होते का ? युरोपमध्ये ध्वनीवर्धक कुठे आहेत ? तुमच्या परमेश्वराला प्रार्थना करा; पण घरात राहून. प्रत्येकाने धर्म घरात ठेवला पाहिजे.

जर्मनीने ३० वर्षांत गाठला महागाईचा उच्चांक !

कोरोना महामारी, तसेच रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीविषयी असलेली संभ्रमाची स्थिती यांमुळे जर्मनीत रहाण्याचा खर्च वाढला आहे. मार्च २०२२ चा महागाई दर हा गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत ७.३ टक्क्यांनी अधिक असू शकतो.