कोरोनाचा पुन्हा प्रभाव

उत्तरप्रदेशातील काही जिल्हे आणि देहली राज्यात मास्क अनिवार्य !
देहलीमध्ये मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड

चौथी लाट !

कोरोनाच्या काळात नागरिकांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. याच प्रयत्नांमध्ये त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे. केवळ कोरोनाच नव्हे, तर कोणताही आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. व्यक्ती, समाज आणि देश हे तिघे आजारी असतील, तर ते कधीही प्रगती करू शकत नाहीत, हे प्रत्येक भारतियाने लक्षात ठेवले पाहिजे !

भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका अल्प आहे ! – पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर

भारतात ‘ओमायक्रॉन’ची तिसरी लाट असतांनाच सर्वसाधारणपणे १०० पैकी ७५ जणांना ‘बीए.२’ या नव्या व्हेरिएंटची लागण होऊन गेलेली आहे. चीनमध्ये १ मासानंतर स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी नेमकेपणाने सांगता येईल.

गोव्यात कोरोनाचा प्रकार ‘ओमिक्रॉन’ कि ‘डेल्टा’ प्रभावी आहे, याविषयी अजूनही अनिश्‍चितता

गोव्यात कोणतीही चाचणी न करता प्रवासी परराज्यांतून येत असल्याने गोव्याला मोठा धोका संभवत आहे. गोव्याच्या सीमांवर केवळ कोरोनाची लस न घेतलेल्यांचीच चाचणी केली जात आहे.

कोरोनाची तिसरी लाट मार्चमध्ये संपेल ! – आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकाचा दावा

जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या आरंभी कोरोना गाठेल सर्वोच्च स्तर ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेपेक्षा अधिक रुग्णसंख्या !

खासगी रुग्णालयांनी अनुमतीविना कोरोनाच्या रुग्णाला भरती करून नये – मनपा

५ जानेवारीला एकाच दिवसात कोरोनाचे १५ सहस्र रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे !

कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

‘सध्या कोरोना आणि ओमिक्रॉन प्रकाराच्या विषाणूचा संसर्ग पुष्कळ वेगाने पसरत आहे. त्यादृष्टीने कोरोनाचा संसर्ग पसरू नये, तसेच त्यापासून नागरिकांच्या जीविताचे रक्षण व्हावे, यासाठी कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

गोव्यात दिवसभरात १ सहस्र २ कोरोनाबाधित : वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण

राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असताना राजकीय मेळा, सभा, कृषी मेळावे प्रचंड गर्दीत चालू आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवे नेते शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने माणसे जमवत आहेत.

मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील ‘बायोमेट्रिक’ यंत्रणा तात्पुरती बंद करण्याचा शासनाचा आदेश !

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग जलदगतीने होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांतील ‘बायोमट्रिक’ यंत्रणा ३१ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

महाराष्ट्रात कोरोनावरील उपाययोजनांचे काम संथ गतीने ! – सौ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

महाराष्ट्रात कोरोनावरील उपाययोजनांचे काम संथ गतीने चालू आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ. भारती पवार यांनी आरोग्य सचिव, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यासमवेत बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले…