नवी देहली – ‘युनेस्को’ने (‘युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन’ने) जगभरातील पुरातन वास्तूंचा शोध घेत वर्ष २०२२ ची सूची घोषित केली आहे. यामध्ये भारतातील अवघ्या ४० वास्तूंचाच समावेश करण्यात आला आहे. यांत ३२ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्र स्वरूपातील ठिकाण आहे. सर्वाधिक म्हणजे ५८ पुरातन वास्तू इटलीमध्ये असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये ५६, जर्मनी ५१, फ्रांस आणि स्पेन या दोन्ही देशांत ४९ पुरातन वास्तू असल्याचे यात म्हटले आहे. युनेस्कोच्या जागतिक पुरातन समितीची चीनमध्ये ४४ वी बैठक पार पडली.
(चित्रावर क्लिक करा)
हिंदु धर्माचा इतिहास लक्षावधी वर्षांचा आहे. त्यामुळे या इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेल्या सहस्रावधी वास्तू भारतात अस्तित्वात आहेत; परंतु दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणीवपूर्वक भारताच्या या वैभवाकडे दुर्लक्ष करत अवघ्या दोन ते अडीच सहस्र वर्षांचा इतिहास लाभलेल्या पाश्चिमात्य देशांमध्ये युनेस्कोला सर्वाधिक पुरातन वास्तू आढळून येत आहेत.
संपादकीय भूमिकालक्षावधी वर्षांचा इतिहास असणार्या भारतातील केवळ ४० वास्तूंची सूची प्रसिद्ध करणार्या युनेस्कोला पुरातन वास्तू ओळखता येतात का ? असाच प्रश्न उपस्थित होतो ! |