श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्तींवरील वज्रलेप अल्पावधीतच निघण्यास प्रारंभ !

मंदिरांच्या सरकारीकरणाचेच हे दुष्परिणाम आहेत, हे लक्षात घ्या ! देवतांविषयी भाव नसणार्‍या सरकारी अधिकार्‍यांकडून मंदिराचे व्यवस्थापन काढून घेऊन ते भक्तांकडे सोपवणेच आवश्यक आहे, असेच हिंदु धर्मप्रेमींना वाटते !

नेवाशात (जिल्हा नगर) रामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंच्याच धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करण्याचे धाडस धर्मांधांकडून गेली अनेक वर्षे केले जात आहे. ‘स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनीही भारतात हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण का निर्माण केले गेले नाही ?’, याचे उत्तर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी द्यायला हवे !

बंगालमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू

अत्यंत असंवेदनशील असणार्‍या ममता बॅनर्जी यांचे जनताद्रोही विधान ! राजकारण करण्यापेक्षा मुलीला न्याय मिळायला हवा ! बलात्कारासंबंधी अशी मानसिकता बाळगणार्‍या बॅनर्जी यांच्या राज्यात पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, याची सूतराम शक्यता नाही, हेच खरे !

शाळेच्या दाखल्यामधील जन्मदिनांकानुसार वय ग्राह्य धरले पाहिजे ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी वय दाखवण्यासाठी मतदान ओळखपत्र किंवा शिकाऊ वाहन परवाना योग्य नाही, असे म्हटले आहे.

३ मेपर्यंत देशभरात मशिदींवरील भोंगे उतरवले गेलेच पाहिजेत !

३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवलेच गेले पाहिजेत. ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवले गेले नाहीत, तर अख्ख्या देशभर हनुमान चालिसा लागली पाहिजे, अशी चेतावणी १२ एप्रिल या दिवशी ठाणे येथील सभेत बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे ३ भाविक घायाळ

व्यंकटेश्‍वर मंदिरात १२ एप्रिलच्या दुपारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात ३ भाविक घायळ झाले.

पंतप्रधान मोदी यांच्या शाहबाझ शरीफ यांना शुभेच्छा !

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानिमित्त शाहबाझ शरीफ यांचे अभिनंदन ! भारताला शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत आतंकवादमुक्त राहील, अशी अपेक्षा आहे.

(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव वाढवण्याचा प्रयत्न चालू !’ – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी हिंदूंनी मिरवणुका काढायच्या नाहीत, ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायच्या नाहीत, असेच गृहमंत्र्यांना वाटते का ?

(म्हणे) ‘पाकिस्तान काश्मीरचे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करील !’

काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, हे पाकिस्तानने नेहमीसाठीच लक्षात ठेवावे; मात्र पाकमधील राजकारण्यांना काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्याविना सत्तेवर बसता येत नाही, हेही तितकेच खरे आहे !

तुमच्या सरकारला सांगा, ‘आमचा कोहिनूर हिरा परत करा !’

हिंदु संस्कृतीचा गौरव राहिलेल्या कोहिनूर हिर्‍यासंबंधी महत्त्वपूर्ण विधान करणारे सुनील गावस्कर यांचे अभिनंदन ! आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी कोहिनूर परत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद !