पाकमध्ये पैगंबर यांचा कथित अवमान करणार्या श्रीलंकेच्या नागरिकाच्या हत्येचे प्रकरण
न्यायालयाने अवघ्या ५ मासांत ८९ जणांना ठरवले दोषी !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या सियालकोट शहरात ३ डिसेंबर २०२१ या दिवशी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून जमावाने श्रीलंकेच्या प्रियंता कुमारा या नागरिकाला जिवंत जाळले होते. या प्रकरणी न्यायालयाने ८९ लोकांना दोषी ठरवले आहे. यांतील ६ जणांना फाशीची, तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रियंता कुमारा हे येथील एका कारखान्यात अधिकारी होते.
Pakistan: Death sentences over killing of Sri Lankan accused of blasphemy https://t.co/V45KOh7It0
— BBC Asia (@BBCNewsAsia) April 18, 2022
संपादकीय भूमिकापाकिस्तानमधील न्यायालय हत्येच्या प्रकरणात अवघ्या ५ मासांत निकाल देत असेल, तर भारतातही हे होणे शक्य आहे. याकडे भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे ! |