हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात १७७ ठिकाणी गदापूजन !

हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहभागाने सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत १०५ ठिकाणी गदापूजन !

श्री संकटमोचन हनुमान मंदिर, कण्णीनगर, दहिटणे येथे सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या शुभहस्ते गदापूजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, श्री. प्रशांत वालीकर हेही उपस्थित होते.

हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन

हनुमान जयंती

चैत्र शुक्ल १५, म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती महोत्सव ! या दिवशी अरुणोदयीच हनुमंताचे पूजन करा. कीर्तन, भजन, करा ! स्तोत्रे म्हणा ! सूर्योदयाला गुलाल-पुष्प-लाह्या उधळून जन्मोत्सव करा. सुंठवड्याचा प्रसाद घ्या. उपवास करा. कृष्ण प्रतिपदेला पारायण करा.

विविध युगांतील धर्मयुद्धामध्ये नामानिराळे राहून धर्माचे रक्षण करणारा हनुमान !

श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून जेव्हा मारुतीराया रथ सोडून अर्जुनासमोर प्रकट झाला, तेव्हा हनुमानाने थोपवलेल्या दिव्यास्त्रांना मुक्त केले. त्यामुळे अर्जुनाच्या रथात मोठा विस्फोट झाला आणि त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या.

हनुमान जयंतीच्या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. संकेत भोवर यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

‘६.४.२०२३ या हनुमान जयंतीच्या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील मारुतिरायाच्या मूर्तीला प्रार्थना केली आणि मी डोळे मिटल्यावर मला दिसले, ‘मारुतिराया गदा खांद्यावर घेऊन मंदिराच्या भोवती ‘राम राम’ म्हणत प्रदक्षिणा घालत आहे.’…

प्रभु श्रीराम आणि भक्तशिरोमणी हनुमान यांच्या भावस्पर्शी भेटीचे दर्शन घडवणारी भावकविता !

‘वर्ष २०१३ मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी मला प्रभु श्रीराम आणि हनुमान यांच्या भावस्पर्शी भेटीचे सूक्ष्मातून दर्शन झाले, तेव्हा देवाच्या कृपेने त्यांच्या भावभेटीवर मला पुढील कविता स्फुरली. त्याचे टंकलेखन मी आता केले.

हनुमान जयंतीनिमित्त हनुमंताविषयी भावप्रयोग चालू असतांना हनुमंताचे अस्तित्व जाणवणे !

‘भावप्रयोग चालू असतांना सभागृहात हनुमंत येत आहे’, असे मला जाणवत होते. ‘तो येत आहे, असे दिसत नव्हते; पण त्याच्या पावलांचे ठसे लादीवर उमटत आहेत’, असे मला दिसत होते.

संबलपूर (ओडिशा) येथील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरील आक्रमण पूर्वनियोजित ! – पोलीस

हनुमान जयंतीनिमित्त मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी केलेले आक्रमण पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हे आक्रमण धार्मिक नव्हते यात चंद्र मिर्झा याचा मृत्यू झाला आहे.