|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने ध्वनीक्षेपकांविषयीची नवी नियमावली लागू केली आहे. यानुसार धार्मिक कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली असली, तरी ध्वनीक्षेपकांचा आवाज धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असला पाहिजे. आवाराबाहेर आवाज जाता कामा नये आणि त्याचा त्रास इतरांना होता कामा नये, असे सरकारने सांगितले आहे.
‘Noise of loudspeakers should not come out of the premises, should not inconvenience others’: UP CM Yogi Adityanathhttps://t.co/c5tYgG2ala
— OpIndia.com (@OpIndia_com) April 19, 2022
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, प्रत्येकाला स्वतःच्या धार्मिक परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे; मात्र त्यासाठी कुणीही कायदा हातात घेऊ नये. ध्वनीक्षेपक वापरण्यास अनुमती आहे; मात्र त्यामुळे होणार्या आवाजाचा त्रास इतरांना होऊ नये. ज्या कार्यक्रमांना आधी अनुमती दिली आहे, त्यांनीच ध्वनीक्षेपकाचा वापर करावा. अनुमतीविना ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास बंदी असून आता नव्याने कुणालाच अनुमती मिळणार नाही. अनुमतीविना धार्मिक मिरवणूक काढू नये आणि अनुमती केवळ पारंपरिक कार्यक्रमांनाच द्यावी. कोणतीही नवीन परंपरा चालू करू नये. उन्माद करणार्या आणि अफवा पसरवणार्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे.