कोरोनाचा पुन्हा प्रभाव

  • उत्तरप्रदेशातील काही जिल्हे आणि देहली राज्यात मास्क अनिवार्य !

  • देहलीमध्ये मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड

प्रातिनिधिक छायाचित्र

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कोरोनाचा ओमिक्रॉन या प्रकाराचा एक उपप्रकार असणार्‍या विषाणूचा संसर्ग विदेशात काही ठिकाणी पसरत असतांना आता भारतातही काही ठिकाणी त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यानंतर देशातून कोरोनाविषयीचे निर्बंध शिथील करण्यात आले असतांना आता पुन्हा काही ठिकाणी हे निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

उत्तरप्रदेश राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरकारने मास्क (मुखपट्टी) घालणे बंधनकारक केले आहे. दुसरीकडे देहली राज्यातही रुग्णसंख्या वाढली असल्याने मास्क अनिवार्य करण्यात आले असून नियम न पाळणार्‍यांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.