हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

काश्मीरमध्ये शारदादेवी मंदिराच्या उभारणीला आरंभ !

शेकडो वर्षांपासूनची तीर्थयात्रेची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न ! मंदिरांच्या उभारणीसमवेत त्यांचे कायमस्वरूपी रक्षण होण्यासाठी जिहादी आतंकवादाच्या विरोधात प्रभावी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘भाजपला मतदान करणाऱ्यांना धमकवा !’

भाजपचे कट्टर समर्थक मतदान करण्यासाठी बाहेर पडू नयेत, यासाठी त्यांना घाबरवा किंवा धमकी द्या. जर ते मतदान करण्यासाठी जात असतील, तर त्यानंतर त्यांनी कुठे रहायचे हे स्वतःच ठरवावे, अशी धमकी त्यांनी दिली.

श्रीलंकेला कायम सहकार्य राहील ! – भारताची ग्वाही

अभूतपूर्व आर्थिक संकटाशी सामना करत असणाऱ्या तुमच्या देशाला आमचे कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची भेट घेऊन त्यांना दिली.

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार हा नरसंहारच ! – अमेरिकेच्या मानवाधिकार आयोगाची अधिकृत मान्यता

जे भारत सरकारने करणे अपेक्षित होते, ते अमेरिकेतील एका मानवाधिकार आयोगाने केले ! धर्मनिरपेक्षतावादाची झापड लावलेल्या आणि हिंदूंवरील अन्यायाला शून्य किंमत देणाऱ्या आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !

आसाममधील अनेक जिल्ह्यांत हिंदूच अल्पसंख्य ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाम राज्यात असे अनेक जिल्हे आहेत, जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत. त्यातही काही जिल्ह्यांत हिंदूंची संख्या ५ सहस्रांहूनही अल्प आहे आणि तेथे मुसलमान बहुसंख्य आहेत. हे माझे वैयक्तिक मत नाही, तर आकडेवारीच तशी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सौदी अरेबियात मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा आदेश !

भारत असा निर्णय घेऊ शकत नाही; ‘या लोकांकडून विरोध होऊ शकतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याचसमवेत या लोकांचे लांगूलचालन करणारे राजकीय पक्षही त्याला विरोध करतील’, हीच भीती सरकारी यंत्रणांना !

५० वर्षे जुना आसाम-मेघालय सीमावाद संपुष्टात !

आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून चालू  असलेला सीमावाद अंततः संपुष्टात आला. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्यात करार झाला.

(म्हणे) ‘मुसलमान व्यापाऱ्यांवरील बंदीची शिकवण देव देत नाही !’ – भाजपचे आमदार विश्वनाथ

बंदी घालण्याची शिकवण देव देत नाही, हे बरोबरच आहे; मात्र ‘असा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ का आली ?’, याचा सारासार विचारही लोकप्रतिनिधी, पोलीस आणि प्रशासन यांनी करायला हवा !

काश्मिरी धर्मांधांनी जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केले, म्हणूनच हिंदूंचा नरसंहार करणे सोपे झाले ! – डॉ. क्षमा कौल, साहित्यिक, जम्मू

त्या भयानक काळरात्रीनंतर तत्कालीन सरकार काश्मिरी हिंदूंसाठी काहीतरी करेल, असे वाटत होते; मात्र तसे काही घडले नाही आणि हिंदूवरील अत्याचार चालूच राहिले !