|
रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाच्या सरकारने देशातील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा आदेश दिला आहे. या भोंग्यांचा वापर केवळ ‘अजान’ (नमाजपठणासाठी बोलावण्यासाठी आवाहन करणे) आणि ‘इकामत’ (नमाजासाठी दुसऱ्यांदा आवाहन करणे) यांसाठी करण्यात यावा, असेही या आदेशात म्हटले आहे. सौदी अरेबियाची लोकसंख्या साडेतीन कोटी आहे. यात ९४ टक्के मुसलमान, तर ३ टक्के ख्रिस्ती आहेत. येथे ९४ सहस्र मशिदी आहेत. (भारतात अंदाजे ३ लाख मशिदी आहेत आणि केवळ १४ टक्के मुसलमान आहेत, तरीही भारत अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही; कारण ‘या लोकांकडून विरोध होऊ शकतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याचसमवेत या लोकांचे लांगूलचालन करणारे राजकीय पक्षही त्याला विरोध करतील’, हीच भीती सरकारी यंत्रणांना वाटते ! – संपादक)
#DNA ANALYSIS : सऊदी अरब एक इस्लामिक देश होते हुए मस्जिदों पर लगे लाउडस्पीकर की आवाज को कम रखने का आदेश दे सकता है. लेकिन भारत एक धर्मनिरपेक्ष देश होते हुए भी ऐसा नहीं कर सकता@sudhirchaudharyhttps://t.co/Lplagpnrud
— Zee News (@ZeeNews) March 28, 2022
१. इस्लामी देश इराणमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार मशिदींवर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज ८५ ते ९५ डेसिबलपर्यंत असतो. याउलट भारतातील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज ११० डेसिबलपर्यंत असतो. ७० डेसिबलपेक्षा अधिक मोठ्या आवाजामुळे मनुष्यावर शारीरिक आणि मानसिक स्तरांवर परिणाम होतो. अनेकांचा रक्तदाब वाढतो.
२. दुबईसारख्या इस्लामी देशात केवळ शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी, तसेच विशेष कार्यक्रमांच्या वेळीच मशिदींवरील भोंग्यांचा वापर केला जातो.
३. नायजेरिया या इस्लामी देशामध्ये वर्ष २०१९ पासून मशीद आणि चर्च यांवर भोंगे लावण्यावर पूर्णपणे बंदी आहे.
४. इंडोनेशियामध्ये मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून ठेवण्याचा आदेशच देण्यात आला आहे. इंडोनेशियामध्ये ९९ टक्के लोकसंख्या मुसलमान आहे.
५. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वर्ष २०१५ पासून मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा नियम आहे. फ्रान्समध्येही अशाच प्रकारचा नियम आहे.