५० वर्षे जुना आसाम-मेघालय सीमावाद संपुष्टात !

  • राज्यांतील सीमावाद सोडवायला ५० वर्षे लागतात, तर शेजारी देशांशी असलेले वाद कधी सुटणार ? – संपादक
  • आता केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादही असाच सोडवावा ! – संपादक
अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्यात करार झाला

नवी देहली – आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून चालू  असलेला सीमावाद अंततः संपुष्टात आला. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्यात करार झाला.

दोन्ही राज्यांच्या सीमावादाच्या १२ पैकी ६ सूत्रांचे निराकरण करण्यात आले, ज्यात सीमेच्या जवळपास ७० टक्के भागांचा समावेश आहे. ‘उर्वरित ६ सूत्रे लवकरात लवकर सोडवली जातील’, असे अमित शहा यांनी सांगितले.