हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘द कश्मीर फाइल्स’ – हिंदु महिलांच्या मनावरील घाव !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य आज शेवटी समाजाला मान्य करावेच लागले. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे हे शक्य झाले. वर्ष १९९० च्या भयानक काळरात्रीनंतर तत्कालीन सरकार काश्मिरी हिंदूंसाठी काहीतरी करेल, असे वाटत होते; मात्र तसे काही घडले नाही आणि काश्मिरी हिंदू महिलांवर होणारे अत्याचार चालूच राहिले. काश्मीरमधील धर्मांध पुरुषांसह महिलांनीही जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केले, म्हणूनच जिहाद्यांना काश्मिरी हिंदूंचा नरसंहार करणे सोपे झाले, असे धक्कादायक वास्तव जम्मू येथील साहित्यिक डॉ. क्षमा कौल यांनी मांडले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘द कश्मीर फाइल्स’- हिंदु महिलांच्या मनावरील घाव !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या. या विशेष संवादामध्ये ‘द न्यू इंडियन’च्या संस्थापक-संपादक आरती टिक्कू आणि ‘पनून कश्मीर’च्या प्रा. शैलजा भारद्वाज यांनीही सहभाग घेतला.

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य कुणी लपवले ? याचा शोध घेणे आवश्यक ! – आरती टिक्कू, संस्थापक-संपादक, ‘द न्यू इंडियन’

वर्ष १९९० च्या दशकात झालेले काश्मिरी हिंदूंच्या सामूहिक हत्याकांडाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य कुणी लपवले ? आणि कुणी ते पुढे येऊ दिले नाही ? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. याला सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत. वर्ष १९९० च्या काळात शेकडो काश्मिरी हिंदु महिलांवर बलात्कार झाले. त्यांच्या हत्या करण्यात आल्या. हिंदूंनी स्वतःची ओळख विसरावी, अशा प्रकारे दहशत निर्माण करण्यात आली. जिहादी आतंकवाद आणि काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाचे वास्तव समोर येता कामा नये अन् सामूहिक आतंकवादाचा कारखाना असाच चालू रहावा, अशी इच्छा जिहादी आतंकवादामुळे ज्यांना लाभ होत होता, ते बाळगून होते.
हे पहा –
♦ हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में ” ‘द कश्मीर फाइल्स’ – हिंदु महिलांच्या मनावरील घाव !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !”
⭕ दी कश्मीर फाइल्स : हिन्दू महिलाओं के मन के घाव ! #TheKashmirFilesTrailer #RightToJustice #VivekAgnihotri https://t.co/rBfJA7k13J
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) March 23, 2022
_________________
भारतीय सैन्यदलामुळेच काश्मीरवर भारताचे नियंत्रण आहे ! – प्रा. शैलजा भारद्वाज, पनून कश्मीर

काश्मीरमधील धर्मांध समाजाने कट्टर आतंकवाद्यांना आमंत्रण दिल्याने आणि त्यांना साहाय्य केल्याने वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. याच वेळी ‘आझाद कश्मीर’च्या नावाखाली दिलेल्या घोषणांमध्ये आतंकवादी, ‘जे.के.एल्.एफ.’ (जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंट) सारख्या आतंकवादी संघटना यांच्यासमवेत स्थानिक धर्मांध नागरिकसुद्धा सहभागी झाले होते. भारताच्या सैन्यदलाने त्या वेळी हस्तक्षेप केला नसता, तर काश्मीर भारतापासून वेगळा झाला असता. अजूनही देशाच्या सैन्यदलामुळेच काश्मीरवर भारताचे नियंत्रण आहे.

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !