ठाणे येथील सेवाकेंद्रात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची भेट झाल्यानंतर मृत मुलाची आठवण येऊनही रडू न येणे

‘मुलाला लवकर मुक्ती मिळावी’, यासाठी प्रतिदिन प्रार्थना करतांना किंवा अन्य वेळी त्याची आठवण येऊन मला रडू येत असे; परंतु सद्गुरु अनुताईंना भेटल्यानंतर मला त्याची आठवण झाली, तरी रडू येत नाही.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची सेवा करतांना साधिकेला श्री दुर्गादेवीच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

एकदा सद्गुरु अनुताईंच्या खोलीत सेवेसाठी जाण्यापूर्वी मी दाराजवळ उभी राहून प्रार्थना करत होते. त्या वेळी मला जाणवले, ‘सद्गुरु अनुताईंच्या ठिकाणी साक्षात् श्री दुर्गादेवी विराट रूपात आहे.’

चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील साधिका डॉ. (सौ.) साधना जरळी यांना साधनेविषयी शिबिरात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

शिबिरात येण्यापूर्वी माझ्याकडून स्वतःच्या कोषात रहाण्याचा आणि एका चौकटीत रहाण्याचा भाग होत होता; परंतु इथे आल्यापासून या कोषातून बाहेर पडण्यासाठी माझे प्रयत्न चालू झाले. त्यासाठी प्रार्थना केल्यामुळे ‘मी प्रत्येक क्षणी शिबिरात एकरूप होत आहे’, असे मला वाटत होते.