तृणमूल काँग्रेसचे आमदार नरेंद्रनाथ चक्रवर्ती यांची धमकी
आणखी किती अत्याचार आणि अन्याय झाल्यानंतर बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येणार आहे ? – संपादक
कोलकाता (बंगाल) – भाजपचे कट्टर समर्थक मतदान करण्यासाठी बाहेर पडू नयेत, यासाठी त्यांना घाबरवा किंवा धमकी द्या. जर ते मतदान करण्यासाठी जात असतील, तर त्यानंतर त्यांनी कुठे रहायचे हे स्वतःच ठरवावे, अशी धमकी पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील पांडवेश्वर मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार नरेंद्रनाथ चक्रवर्ती यांनी दिली. ते कार्यकर्त्यांच्या संमेलनात बोलत होते. ‘जर हे लोक मतदान करण्यास जाणार नसतील, तर आम्ही समजू की, ते आमचे समर्थक आहेत’, असेही चक्रवती म्हणाले. राज्यातील पोटनिवडणुकीच्या संदर्भात चक्रवर्ती बोलत होते.
Stay at your own risk in West Bengal if you vote for BJP: TMC MLA initiates ‘Khela’ ahead of bypolls https://t.co/Kr0a9j4yCW
— OpIndia.com (@OpIndia_com) March 29, 2022
या संदर्भात आसनसोलचे माजी महापौर आणि भाजपचे नेते जितेंद्र तिवारी म्हणाले की, चक्रवर्ती यांना तृणमूल काँग्रेसचा पराभव दिसू लागल्यानेच ते धमकी देत आहेत.