स्वार्थ साधण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे कौतुक !
इम्रान खान मनापासून भारताचे कौतुक करत आहेत’, असे कुणी समजू नये. पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला भारताशी व्यापार करायचा आहे. त्यामुळे खान भारताला चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत ! – संपादक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘क्वाड’ देशांच्या संघटनेचा भाग असलेल्या भारताने अमेरिकेच्या निर्बंधांची भीती न बाळगता रशियाकडून कच्चे तेल आयात केले. भारताने नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण राखले. भारताचे परराष्ट्र धोरण पाकिस्तानपेक्षा चांगले आहे, अशा शब्दांत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले.
Imran Khan praises India’s independent foreign policy, says India gave priority to its people and not western pressure over Russia-Ukraine warhttps://t.co/b8t8wPevF8
— OpIndia.com (@OpIndia_com) March 20, 2022
ते खैबर-पख्तुन्ख्वा प्रांतात एका जाहीर सभेत बोलत होते.