शहरात जमावबंदी लागू
|
निजामाबाद (तेलंगाणा) – जिल्ह्यातील बोधन शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आल्यावरून धर्मांधांनी हिंसाचार केला. यामुळे येथे जमावबंदी लागू करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यासाठी कोणतीही अनुमती घेण्यात आली नव्हती, असा दावा धर्मांधांकडून केला जात आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला. या प्रकरणी काही जणांना कह्यात घेण्यात आले आहे.
Telangana: Situation in Bodhan town of Nizamabad peaceful a day after two groups indulged in protests and stone pelting over installation of Chhatrapati Shivaji Maharaj’s statue, say police
— Press Trust of India (@PTI_News) March 21, 2022
१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोधन शहरात हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता; पण या पुतळ्याला धर्मांधांनी विरोध केला. यामुळे दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळानंतर धर्मांधांनी दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला. या धुमश्चक्रीमध्ये पोलीस कर्मचारीही घायाळ झाले.
२. भाजपचे नेते धर्मपुरी अरविंद यांनी ट्वीट करून सांगितले, ‘महाराष्ट्राला लागून असलेल्या बोधन शहराच्या आंबेडकर चौकात छत्रपती शिवाजी महारजांचा पुतळा उभारण्याची योजना होती. बोधन जिल्हा परिषदेने पुतळा स्थापन करण्यास अनुमती दिली होती; पण सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समिती आणि एम्.आय.एम्. यांच्या गुंडांची गोंधळ घातला. ‘तेलंगाणा राष्ट्र समितीचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यावरून उघडपणे धमकी देत आहे’, असा आरोपही त्यांनी केली.