कोलार (कर्नाटक) येथील ‘क्लॉक टॉवर’वर गेल्या ७५ वर्षांपासून फडकत असलेला इस्लामी ध्वज काढून राष्ट्रध्वज फडकवला !

  • टॉवरचा हिरवा रंग पुसून पांढरा रंग दिला !

  • पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त !

  • या ‘टॉवर’वर फडकणार्‍या इस्लामी ध्वजाला इतक्या वर्षांत निधर्मीवाद्यांनी कधीही विरोध केला नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • गेली ७ दशके इस्लामी ध्वज फडकत रहायला कोलार भारतात आहे की पाकिस्तानात ? आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! देशात आणखी किती ठिकाणी अशा प्रकारे इस्लामी प्रतीक असलेले ध्वज आहेत, हे शोधून सरकारने तेथे धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घ्यावी, असेच राष्ट्रभक्तांना वाटते ! – संपादक
डावीकडून जुना ‘क्लॉक टॉवर’ आणि बदल केलेला ‘क्लॉक टॉवर’

कोलार (कर्नाटक) – जिल्ह्यातील ‘क्लॉक टॉवर’वर गेली ७५ वर्षे फडकत असलेला इस्लामी ध्वज काढून त्याऐवजी राष्ट्रध्वज फडकवला गेला. यासह या ‘टॉवर’ला दिलेला हिरवा रंग पुसून पांढरा रंग देण्यात आला आहे. १९ मार्च या दिवशी जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली. या प्रसंगी घटनास्थळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. शीघ्र कृती दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली होती.

१. काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार मुनीस्वामी एस्. यांनी ‘क्लॉक टॉवर’वरील इस्लामी ध्वज काढून तेथे राष्ट्रध्वज फडकावला जाईल’, असे आश्‍वासन दिले होते. वरील कारवाई झाल्यावर मुनीस्वामी यांनी ट्वीट करून म्हटले की, ७४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘विशेष समुदाया’चा ध्वज काढून तेथे राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.

२. वर्ष १९३० मध्ये मुस्तफा नावाच्या एका व्यापार्‍याने हे ‘टॉवर’ उभारले होते.