ही राष्ट्रप्रेमींची फार पूर्वीपासूनची इच्छा असल्यामुळे ती लवकरात लवकर पूर्ण करावी, असेच राष्ट्रप्रेमींनी वाटते ! – संपादक
जम्मू – ज्या प्रकारे काश्मीरसाठीचे कलम ३७० हटवले, त्याप्रमाणे पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प पूर्ण करील, असे विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले आहे. जितेंद्र सिंह यांनी कठुआमध्ये जम्मू काश्मीरचे संस्थापक महाराज गुलाब सिंह यांच्या २० फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. जम्मू-काश्मीरचे प्रसिद्ध मूर्तीकार पद्मश्री रविंदर जामवाल यांनी घोड्यावर बसलेल्या महाराज गुलाब सिंह यांचा कास्याचा पुतळा बनवला आहे.
जितेंद्र सिंह म्हणाले की, वर्ष १९९४ मध्ये आवाजी मतदानाने संसदेत प्रस्ताव पारित करण्यात आला होता. यामध्ये पाकिस्तानचे अवैध नियंत्रण असलेला जम्मू-काश्मीरचा भाग रिकामा करावा लागेल, असे म्हटले होते. पाकव्याप्त काश्मीरला स्वतंत्र करणे आमचा संकल्प आहे. कलम ३७० रहित केले आणि भाजपने यासंदर्भात आश्वासन दिले होते. हे काही लोकांच्या कल्पनेच्या पलीकडील होते.
Under PM Modi’s leadership, BJP will complete every unfinished task: BJP Minister Jitendra Singh on re-integrating PoK into Indian territoryhttps://t.co/pYMI60NTJU
— OpIndia.com (@OpIndia_com) March 21, 2022