पुण्यातील एल्गार परिषदेत झळकले कोरेगाव भीमा दंगलीतील संशयित आरोपींचे ‘पोस्टर ’

संशयित आरोपींचे पोस्टर लागूनही पोलिसांनी परिषदेच्या आयोजकांवर कारवाई का केली नाही ?  

(म्हणे) ‘राष्ट्रध्वजाचा अपमान करणार्‍याला अटक करा !’ – राकेश टिकैत, शेतकर्‍यांचे नेते

शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये समाजविघातक घटक घुसल्याचे पुढे आल्यावर टिकैत यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांना रोखण्यासाठी काहीही केले नाही, हेच खरे !

आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होऊन ती आपोआप सात्त्विक पर्याय निवडते ! – शॉन क्लार्क

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘उद्योगांचा समाजावर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’ या विषयावरील संशोधनाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

राष्ट्ररक्षणाचे धडे देऊन राष्ट्रप्रेमी युवा पिढी सिद्ध केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’, असे नामकरण केले. आपल्याला ‘इंडिया’ या शब्दामुळे गुलामगिरीची जाणीव होते. आपली ही मानसिकता पालटण्यासाठी आपण ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ असेच संबोधणे आवश्यक आहे.

यवतमाळ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गोळा झालेले राष्ट्रध्वज शासनाला सुपुर्द !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये ‘राष्ट्रध्वज सन्मान पेटी’ फिरवण्यात आली. त्यात खराब झालेले, खाली पडलेले आणि नागरिकांनी दिलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यात आले.

ऐतिहासिक वास्तू, दुर्ग आणि गड पर्यटकांसाठी खुले ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

जिल्ह्यातील प्रतिबंधक क्षेत्र वगळून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

आयुक्तांच्या नावे खोटे फेसबूक खाते उघडून पैशांची मागणी

केवळ बनावट खाते बंद करण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा असे गुन्हे करण्याचे गुन्हेगारांचे धैर्य होणार नाही, अशी कडक कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे !

भाजप महिला मोर्चाच्या वतीने ‘चक्काजाम आंदोलन’

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील उड्डाणपुलाखाली ‘चक्काजाम आंदोलन’ करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान 

हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर म्हणाले की, क्रांतीकारकांनी घराची होळी करून, घरावर तुळशीपत्र ठेवून, संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले आहे; परंतु आता सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये राष्ट्राभिमान निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

रामचरितमानस आणि शिक्षा !

सध्याच्या कायदेप्रणालीने हिंदु धर्मग्रंथांचा उल्लेख निकाल देतांना करणे, ही धर्मग्रंथांची परिपूर्णता आणि कालातीतता स्पष्ट करते. या धर्मग्रंथांतील शिकवणुकीनुसार मानवजातीने आचरण केल्यास निश्‍चितपणे समष्टी हित जपले जाईलच, गुन्हेगारीही अल्प होईल, हे येथे लक्षात घ्यावे.