भाजप महिला मोर्चाच्या वतीने ‘चक्काजाम आंदोलन’

सातारा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील उड्डाणपुलाखाली ‘चक्काजाम आंदोलन’ करण्यात आले.

या वेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या सुवर्णादेवी पाटील, भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.