इंजेक्शन मागे २१ पैसे अधिक घेतल्याने औषध विक्रेत्यास १४ वर्षांनंतर ४० सहस्र रुपयांचा न्यायालयाकडून दंड !

‘एखादा खटला १४ वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?’,

न्यूयॉर्कमध्ये चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात २ जण ठार

न्यूयॉर्क येथील सबवेमध्ये ‘हे आतंकवादी आक्रमण होते का?’ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे एका दिवसाचे वैचारिक धर्मांतर ! – सौ. वेदिका पालन

व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भेटवस्तूंची विक्री होत असते आणि विदेशी आस्थापने त्याचा लाभ उठवतात. यासाठी देशाची आर्थिक हानी करणार्‍या आणि संस्कृतीचेही हनन करणार्‍या या ‘डे’वर सर्वांनी बहिष्कार घातला पाहिजे

कणकवली शहरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या हद्दीत येणारी बांधकामे पाडली जाणार

कणकवली शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अखेरच्या टप्प्यात आले असतांनाच महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गाच्या हद्दीत येणारी (‘राईट ऑफ वे’च्या येणारी) बांधकामे काढण्याविषयी हालचाली गतीमान झाल्या आहेत.

‘मुरुगा’ देवतेला ‘तमिळ भाषेची देवता’ असे नाव देता येणार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या अनेक देवता या शास्त्रे आणि कला यांच्या देवता आहेत. हिंदूंच्या धर्मशास्त्रात तसा उल्लेख आहे. त्यामुळे असा निर्णय देतांना न्यायालयाने हिंदूंचे सर्वोच्च गुरु शंकराचार्य यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी कारवाईस प्रारंभ !

बहुचर्चित अतिक्रमण विरोधी कारवाई ११ फेब्रुवारी या दिवशी चालू करण्यात आली आहे. कपिलतीर्थ मार्केट पासून चालू झालेल्या या कारवाईने संपूर्ण ताराबाई रस्ता अतिक्रमणमुक्त झाला आहे.

कार्निव्हल महोत्सवावर राज्यशासन ६० लाख ३५ सहस्र रुपये खर्च करणार

वैचारिक आणि सांस्कृतिक पर्यावरण धोक्यात आणणार्‍या कार्निव्हलवर लाखो रुपये खर्च करणे अपेक्षित नाही !

कोल्हापूर जिल्ह्यात ७४ टक्के कोरोना लसीकरण पूर्ण ! – डॉ. उमेश कदम, अधीक्षक

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून चालू झालेल्या कोरोना लसीकरणातील ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण १ सहस्र ७०० पैकी १ सहस्र २७२ जणांना आजपर्यंत ही लस देण्यात आली आहे.

प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद उफाळला

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा भाजप म्हणजेच राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर कणकवली येथे दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचे सखोल अन्वेषण केले जाईल असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या अन्वेषणाविषयी विचारले असता केले.