|
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात गेल्या ऑगस्ट मासापासून हिंदूंवर अत्याचार होण्यासह भारतविरोधी धोरणे राबवली जात असतांना बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने भारतातून तांदूळ आयात करण्यास चालू केले आहे. सध्या २ लाख टन तांदूळ भारताकडून खरेदी करण्यात येणार आहे. यातील २७ सहस्र टन तांदळाची पहिली खेप बांगलादेशातील चितगाव येथे पोचली.
Bangladesh will purchase 2 lakh tons of rice from India.
It will purchase an additional 16 lakh tons of rice from private exporters in India. The first shipment of rice has reached #Chittagong
Bangladesh will come to its senses only if an economic boycott is imposed on it.… pic.twitter.com/7mXO9huLaF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 28, 2024
१. बांगलादेशाच्या अन्न अधिकार्याने सांगितले की, बांगलादेशात सध्या तांदुळाची कमतरता नाही; मात्र नुकत्याच आलेल्या भीषण पुरामुळे भविष्यातील संकट टाळण्यासाठी सरकारने तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार २ लाख टन तांदुळाखेरीज आणखी १ लाख टन तांदूळही निविदेद्वारे भारतातून आयात करणार आहे. तसेच बांगलादेश सरकारकडून भारतातील खासगी निर्यातदारांकडून आतापर्यंत १६ लाख टन तांदूळ आयात करण्याची अनुमती घेण्यात आली आहे. आम्ही म्यानमारसमवेत १ लाख टन तांदूळ आयात करण्यासाठी करारही केला आहे. यासमवेच व्हिएतनाम आणि पाकिस्तान यांच्याशी यासंदर्भात चर्चा करत आहोत.
२. बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय कुमार वर्मा यांनी अलीकडेच सांगितले की, ५ ऑगस्टच्या पालटलेल्या घटनांतरही मला वाटते की, आम्ही बांगलादेशाच्या अंतरिम सरकारसमवेत पूर्ण प्रामाणिकपणे काम केले आहे. (अशा प्रामाणिकपणाला मुर्खपणा म्हणायचे का ? याचा विचार भारताने करणे आवश्यक आहे ! सापाला दूध पाजल्याने तो अमृत देणार नाही, तर गरळच ओकणार असेल, तर ही गांधीगिरी कशासाठी केली जात आहे ? – संपादक)
संपादकीय भूमिकाबांगलादेशावर आर्थिक बहिष्कार घातला, तरच तो वठणीवर येणार आहे. त्यामुळे भारत सरकार आणि येथील व्यापारी यांनी हे लक्षात घेऊन अशा प्रकारे पावले उचलणे आवश्यक ! |