हरियाणातील गावामध्ये प्रवेश करण्यास भाजप आणि जजपा यांच्या नेत्यांना बंदी

चरखी दादरी जिल्ह्यातील एका गावात सत्ताधारी भाजप आणि आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीच्या (जजपा) नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

पाकच्या सिंध प्रांतातील अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांचे रक्षण करा ! – अमेरिकेतील सिंधी संघटनेची मागणी

पाकमधील सिंधी संघटना बहुसंख्य हिंदूंचा देश असणार्‍या भारताकडे साहाय्य मागत नाही, तर अमेरिकेकडे साहाय्य मागते ! यावरून ‘भारत पीडित हिंदूंसाठी काहीही करणार नाही, हे जगभरातील हिंदूंच्याही लक्षात आले आहे’, असे समजायचे का ?

जलालाबाद (पंजाब) येथे शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस यांच्यात हिंसाचार !

काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसींची गुंडगिरी ! असा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?

देहलीऐवजी चीनच्या सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती ! – संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

६ फेब्रुवारीला देशभर रस्ता बंद आंदोलन ! – किसान मोर्चाची घोषणा

असे बंदचे आयोजन करून जनतेला वेठीस धरणार्‍या संघटना आणि त्यांचे नेते यांच्यावर कारवाई आवश्यक !

कृषी कायद्यांवर चर्चा करण्यावरून झालेल्या गोंधळामुळे राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित !

जसे वर्गात गोंधळ घालणार्‍या मुलांना शिक्षा केली जाते, त्याच प्रकारे संसदेत गोंधळ घालणार्‍या सदस्यांवर कारवाई होणे आवश्यक ! संसदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे होणार्‍या पैशांचा अपव्य लक्षात घेता हा निधीही अशा बेशिस्त सदस्यांकडून वसुल करा !

रामाच्या देशात पेट्रोल महाग, तर सीता आणि रावण यांच्या देशात स्वस्त ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी यापूर्वीही पेट्रोल दर वाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

कळंबा कारागृहातील पोलीस शिपायाकडून बंदीवानांच्या नातेवाइकांकडे २५ सहस्र रुपयांची मागणी

अशा भ्रष्ट पोलिसांचा भरणा असलेले पोलीसदल कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? आता पोलीसदलातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी या क्षेत्रात ‘स्वच्छता अभियान’ राबवणे आवश्यक !