पुण्यातील एल्गार परिषदेत झळकले कोरेगाव भीमा दंगलीतील संशयित आरोपींचे ‘पोस्टर ’

संशयित आरोपींचे पोस्टर लागूनही पोलिसांनी परिषदेच्या आयोजकांवर कारवाई का केली नाही ?  

पुणे – येथील गणेश कला क्रीडा मंचमध्ये ३० जानेवारी या दिवशी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते; मात्र आयोजित ठिकाणी कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या १९ संशयित आरोपींचे ‘पोस्टर’ लावण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर परिषदेच्या मुख्य मंचावरसुद्धा आरोपी असलेल्या कार्यकर्त्यांचे ‘पोस्टर’ लावण्यात आले होते.

एल्गार परिषदेतील पोस्टर वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा – 

या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभराचा आढावा घेण्यासाठी २ आय.पी.एस्. अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. परिषदेला येणार्‍या प्रत्येकाची ओळख छायाचित्राच्या माध्यमातून टिपली जात होती, तसेच कार्यकर्त्यांना इतर कोणतेही सामान आतमध्ये नेण्यास मनाई करण्यात आली होती.