जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी ५ पोलिसांवर गुन्हा नोंद

अशा पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे.

बिहारमध्ये कोरोना चाचणी घोटाळ्याच्या प्रकरणी ५ अधिकारी निलंबित

राज्यातील जमुईत सिकंदरा आणि बारहाट येथे तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला.

केरळच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशाकडून पत्नीला तोंडी तलाक

कमाल पाशा यांनी धमकी दिली होती, ‘जर तू तलाक देण्यास नकार दिला, तर याचे परिणाम फार वाईट होतील.’

हिंसाचारासाठी चिथावणी दिल्यावरून ब्रिटनमधील ‘खालसा टीव्ही’ वाहिनीला ५० लाख रुपयांचा दंड !

ब्रिटनमध्ये चुकीचे आणि समाजविघातक प्रसारण करणार्‍या वाहिन्यांवर कारवाई होते. भारताने यातून बोध घेणे आवश्यक !

चीनच्या मोठ्या धरणामुळे मेकांग नदी सुकल्याने ५ देशांतील ७ कोटी लोकांवर दुष्परिणाम !

चीनकडून ब्रह्मपुत्रानदीवरही धरणे बांधली जात असल्याने भविष्यात भारताच्या ईशान्य भारतातही अशी स्थिती येऊ शकते .

(म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवणार !’

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे चांगले उमेदवार म्हणजे धर्मांधांचे लांगूलचालन करणारे उमेदवार, हे वेगळे सांगायला नको !

ओझर-कांदळगाव-मसुरे रस्त्याच्या कामासाठी कांदळगाववासियांनी दीड घंटा वाहतूक रोखली

रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

जम्मू-काश्मीर, पंजाब आणि देहली येथे भूकंपाचे धक्के

उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी नवी देहलीसह अनेक भागांमध्ये १२ फेब्रुवारीच्या रात्री ६.१ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले.

रेल्वे स्थानकात ४ वर्षे ३ लाख रुपये असलेली तिजोरी पडून राहिल्याने नोटा झाल्या खराब !

याला उत्तरदायी असलेल्यांकडून व्याजासहित सर्व रक्कम वसूल केली पाहिजे !

दोडामार्ग तालुक्यातील परप्रांतीय भूमीमालक आणि कामगार यांची चौकशी करा !

‘भारतीय जनता युवा मोर्चा’ची दोडामार्ग तहसीलदार आणि पोलीस यांच्याकडे मागणी