मुसलमानबहुल नूंह (हरियाणा) येथील घटना
नूंह (हरियाणा) – मुसलमानबहुल नूंह येथे भूमाफिया मुसलमानांकडून होणारे बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी गेलेले खाण विभागाचे पथक आणि पोलीस यांच्यावर आक्रमण करण्याची घटना हथनगावच्या डोंगरावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून १ जेसीबी यंत्र जप्त केले.
पोलिसांनी जेव्हा घटनास्थळावरून जेसीबी यंत्र जप्त करून नेत असतांना १५ ते २० मुसलमान तेथे पोचले आणि त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास चालू केले. यात काही महिलांचाही समावेश होता. त्यांनी घेराव घातला आणि या पथकावर आक्रमण केले. आक्रमण करणार्यांमध्ये शाजीद, वाजिद शाहीद, समसुद्दीन यांच्यासह शाइस्ता आणि झाहिद या महिलांचाही समावेश होता. तसेच गावातील १५ लोकांनीही त्यांच्यावर आक्रमण केले.
संपादकीय भूमिकाहरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! |