प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान 

श्री. हर्षद खानविलकर

नाशिक – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या निमित्त ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या वेळी श्री. खानविलकर म्हणाले की, क्रांतीकारकांनी घराची होळी करून, घरावर तुळशीपत्र ठेवून, संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले आहे; परंतु आता सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये राष्ट्राभिमान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण यासाठी आजपासून पण करूया. या वेळी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चा अर्थ श्री. खानविलकर यांनी सांगितला. या वेळी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यात आले. या कार्यक्रमाला मराठवाडा आणि विदर्भ या प्रांतातील धर्मप्रेमी मोठ्या संख्येने ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.