गुन्हेगाराचे नाव वगळण्यासाठी राजकीय दबाव !
पिंपरी (पुणे) – सराईत गुन्हेगार प्रशांत दिघे याने साथीदारांच्या साहाय्याने एकावर २२ डिसेंबर या दिवशी खुनी आक्रमण केले. या गुन्ह्याची नोंद करतांना प्रशांत दिघे याचे नाव घालू नये, यासाठी एका मोठ्या स्थानिक लोकप्रतिनिधीने पोलिसांवर दबाव टाकला. त्यामुळे सराईत गुन्हेगाराचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले. याची माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना मिळताच संबंधित गुन्हेगाराला त्वरित अटक करण्याचे आदेश दिले. राजकीय दबावाला भुललेले पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. (निलंबन नको, तर बडतर्फ हवे ! – संपादक)
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रशांत दिघे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, हत्यारबंदी, जबरी चोरी यांसारखे १९ गंभीर गुन्हे नोंद आहेत. २२ डिसेंबर या दिवशी काळेवाडी येथे २ गटांत हाणामारी झाली. त्यात आरोपीने एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आपण सांगूनही कारवाई केल्याचा राग आल्याने संबंधित लोकप्रतिनिधीने पोलीस प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. पोलीस हप्ता वसुली करत असल्याचेही त्याने सांगितले. (अशा पोलिसांमुळेच पोलीस खाते अपकीर्त होत आहे, हे लक्षात घेऊन गुन्हे करणार्या पोलिसांना कठोर शिक्षा त्वरित द्यायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिका :
|