हिंदूंच्या देवतेचे अवमानकारक चित्र पोस्ट केल्याच्या प्रकरणी पाकच्या सत्ताधारी पक्षाच्या खासदाराची क्षमायाचना !

पाकमध्ये धर्मांधांच्या दहशतीखाली वावरत असूनही तेथील हिंदू सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला क्षमायाचना करण्यास भाग पाडतात, हे कौतुकास्पद आहे.

वानवडी (पुणे) येथे गोमांस वाहतूक करणार्‍या वाहनातून १२ गोवंशियांचे मांस पकडले !

गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गोवंश हत्या थांबलेली नाही ! माता म्हणून पूजल्या जाणार्‍या गोमातेचे रक्षण कायमचे होण्यासाठी हिंदूंचे राष्ट्र निर्माण व्हावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

गेल्या ८ मासांत चिनी वस्तूंच्या खरेदीत ३ टक्क्यांची वाढ !

यातून भारतियांची देशभक्ती किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला देशभक्ती न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! भारतीय चीनकडून देशभक्ती शिकतील तो सुदिन !

अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील सक्षम लोकांना शिक्षण आणि नोकरी यांतील आरक्षण रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

या याचिकेत लोकांनी स्वछेने आरक्षण सोडावे, असा पर्याय देण्याचाही आग्रह केला आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून पुढील मासात सुनावणी होऊ शकते.

एखाद्या राजासारखे वागू नका ! – पंतप्रधान मोदी यांचा भाजपच्या नेत्यांना सल्ला

‘सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून लोकसेवा हा हेतू आहे’, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. ते पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करत होते.

भाजपच्या नेत्यासह त्याच्या दोन्ही मुलांना अटक

भाजपचे नेते गुन्हेगारीत सहभागी असणे हिंदूंना अपेक्षित नाही !

महाराष्ट्रात मुसलमानांना आरक्षण लागू करण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ठराव

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे. त्याअंतर्गत काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत असा ठराव संमत करण्यात आला.

चिनी आस्थापनांना गुंतवणूक करण्याची अनुमती देण्याचा कोणताही विचार नाही ! – केंद्र सरकार

राष्ट्रहितासाठी चिनी आस्थापनांना आता भारतात गुंतवणूक करण्याची अनुमती देऊ नये !