मुसलमान पुरुष पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह करू शकतो; मात्र मुसलमान महिला असे करू शकत नाही !  – पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालय

चक्रावणारा न्याय !

पिंपरी-चिंचवड येथील आर्टीओ परिसरात आग लागून २ वाहने जळून खाक

आर्टीओ परिवहन कार्यालयाच्या परिसरात अनुमाने १५९ वाहने होती. परिसराच्या एका भिंतीजवळ कचर्‍याला दुपारी अचानक आग लागली.

कोरोना काळातील शाळेचे १०० टक्के शुल्क भरावे लागणार ! – सर्वोच्च न्यायालयाचा विद्यार्थांच्या पालकांना आदेश

राजस्थानमधील एका शाळेच्या व्यवस्थापन समितीने या संदर्भात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने असा आदेश दिला आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये वुहान (चीन) बाजारपेठेच्या बाहेर कोरोनाचा प्रसार झाल्याचे पुरावे सापडले ! – जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांचा दावा

अन्वेषण करण्यास गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वुहान येथील प्रयोगशाळेतूनच जगभरात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले होते.

सांगली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेला उपग्रह रामेश्‍वर तेलंगणा येथून अवकाशात झेपावला

तेलंगणाच्या राज्यपाल श्रीमती तमिलीसाई सौंदर्याराजन्, इस्रोचे माजी संचालक डॉ. ए. शिवथानू पिलाई, इस्रोचे संचालक पद्मश्री डॉ. मल्लयस्वामी अण्णादुराई उपस्थित होते.

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे त्रिस्तरीय नाकाबंदी

कोरोनामुळे यंदाच्या वर्षी माघ यात्रा भाविकांविना साजरी करण्यात येणार आहे. या काळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

पं. भीमसेन जोशी हे मराठी आणि कानडी या २ संस्कृतींना जोडणारा दुवा होते ! – माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार

मराठी-कानडी वाद मिटवणे आजपर्यंत राजकारण्यांना जमलेले नाही; पण संगीताच्या माध्यमातून या दोन्ही समाजांमध्ये संवाद प्रस्थापित करण्याचे काम पं. भीमसेन जोशी यांनी केले आहे.

एकाही कोरोना रुग्णावर उपचार न करता सवा पाच कोटी रुपये देयक पाठवणार्‍या पुणे येथील स्पर्श रुग्णालयावर कारवाई करावी !

सेंटरसाठी महापालिकेने करारच केला नसतांना आणि एकाही रुग्णावर उपचार झाले नसतांना हे देयक मागणे ही महापालिकेची शुद्ध फसवणूक आहे.

श्री क्षेत्र वीर, सासवड येथील श्री म्हस्कोबा यात्रा रहित करण्याचा निर्णय

भाविकांनी यात्रेसाठी गावात येऊ नये, असे आवाहन सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप आणि देवस्थान समिती यांनी केले आहे.

कोटीशः प्रणाम !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश (मोरटक्का, मध्यप्रदेश) यांचा प्रकटदिन (दिनांकानुसार)