अमृतसर (पंजाब) – येथील पोलीस ठाण्यावर हातबाँब फेकल्याच्या प्रकरणात पंजाब पोलिसांच्या विशेष पथकाने २ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक केली आहे. या दोघांकडून त्यांचे सूत्रधार परदेशात बसून घातपात करवून घेत होते. गुरजीत सिंह आणि बलजीत सिंह अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत. हे दोघेही केवळ बाँब फेकण्यातच नाही, तर अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्करी यांच्या माध्यमातून देशात आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून १.४ किलो हेरॉईन, १ हातबाँब आणि २ पिस्तुले जप्त केली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली, तर ३ जणांना उत्तरप्रदेशातील पिलीभीत येथे चकमकीत ठार करण्यात आले.
संपादकीय भूमिकाअशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! |