माझ्या यशात भारतीय संस्कारांचा सर्वांत मोठा वाटा !

माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वांत मोठी शिकवण आहे.- ‘नासा’तील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ स्वाती मोहन

वेब सीरिज आणि चित्रपट यांतून हिंदु धर्माचे वस्त्रहरण होत असतांना नाना पटोले झोपले होते का ? – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

‘‘नाना हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत. अभिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांच्या चित्रपटांना करणी सेना संरक्षण देईल. पटोले यांच्या गुंडगिरीला त्याप्रमाणेच उत्तर देऊ.’’

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्‍वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !

हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या काही संतांना हवेत सशस्त्र सुरक्षारक्षक !

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि महामंत्री यांच्यासहित ५ प्रमुख संतांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आली आहे, तर अन्य २६ संतांना सरकारी खर्चाने सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

(म्हणे) ‘गलवान खोर्‍यातील संघर्षात आमचे ४ सैनिक मृत्यू पावले !’

चीनचे ४० ते ४५ सैनिक ठार झाल्याचा दावा अमेरिका, रशिया आणि अन्य देशांनी केला असतांना कालपर्यंत कुणीही ठार झाला नसल्याचा दावा करणार्‍या चीनची ही स्वीकृती म्हणजे साळसुदपणाच, हे वेगळे सांगायला नको !

उत्तरप्रदेशात मंदिराची भूमी बळकावण्यासाठी देव मरण पावल्याची कागदोपत्री नोंद !

हिंदूंनो, अशा घटनांमुळेच मंदिरांचे सरकारीकरण करण्याचे कारण राज्य सरकारांना मिळते आणि ते मंदिरे नियंत्रणात घेतात, हे लक्षात घ्या !

कोरोनावरील ‘पतंजलि’चे ‘कोरोनिल’ हे औषध प्रभावी असल्याचा योगऋषी रामदेवबाबा यांचा पुन्हा दावा !

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शोधप्रबंध प्रकाशित : आता तरी सरकारने ‘आत्मनिर्भर भारता’च्या पार्श्‍वभूमीवर योगऋषी रामदेवबाबा यांच्या शोधनिबंधाचा अभ्यास करून त्यात तथ्य असल्यास ते समाजापर्यंत पोचवणे आवश्यक !

काश्मीरमध्ये २ चकमकीमध्ये ३ आतंकवादी ठार, तर एक अधिकारी हुतात्मा

एकेका आतंकवाद्याला ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट केल्यावरच तो नष्ट होईल !