कोल्हापूर, ३१ जानेवारी – कोल्हापूर जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वास्तूंचा वारसा आहे. या वारशांना लाखो पर्यटक भेट देतात. या पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे चालू करावीत, अशी मागणी होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रतिबंधक क्षेत्र वगळून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. ही स्थळे खुली करतांना संबंधित विभागाने सर्व स्थळांवर आवश्यक त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे, तसेच ‘मास्क’ आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
याचसमवेत जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून सध्या चालू असलेली दळणवळण बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे, असेही आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.