बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची सांगली जिल्ह्यात शोधमोहीम राबवा ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

२९ डिसेंबरला सांगली येथे मोर्चा !

नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

सांगली, २७ डिसेंबर (वार्ता.) – राज्यामध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांची शोधमोहीम चालू करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यासह सांगली जिल्ह्यामध्ये सहस्रो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुसलमानांनी जिल्ह्यातील लोकांचा रोजगार, नोकर्‍या, निवारा हिसकावून घेतले आहेत. या बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान यांच्यामुळे देशाला अंतर्गत धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची शोधमोहीम राबवून त्यांना या देशाबाहेर काढावे, अशी मागणी ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) या मागणीसाठी २९ डिसेंबरला सांगली शहरातून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हिंदु एकता आंदोलन आणि इस्कॉन यांच्या वतीने श्रीराममंदिर चौक, पंचमुखी मारुति रस्ता या मार्गाने मारुति चौकापर्यंत २९ डिसेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मोर्च्याचा प्रारंभ दुपारी ४ वाजता होईल. मोर्च्याचे रूपांतर सभेत होईल. या मोर्च्यामध्ये सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष सहभागी होणार आहेत. तरी सर्व हिंदू आणि राष्ट्रभक्त यांनी मोठ्या संख्येने या मोर्च्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. नितीन शिंदे यांच्यासह हिंदु एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, इस्कॉनचे प्रमुख श्री. कृष्णा किशोर दास प्रभुजी, मच्छ अवतार दास, श्री. सोमनाथ गोठखिंडे आदींनी केले आहे.