केवळ बनावट खाते बंद करण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा असे गुन्हे करण्याचे गुन्हेगारांचे धैर्य होणार नाही, अशी कडक कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे !
नवी मुंबई – पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नावाने खोटे फेसबूक खाते उघडून त्यावरून पैशाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्यावर संबंधित खाते बंद करण्यात आले आहे.
सुधाकर देशमुख यांच्या फेसबूक खात्यावरून त्यांच्या मित्रांकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. हे लक्षात येताच मित्रांनी त्यांना संपर्क करून याविषयी विचारणा केली. त्यानंतर ही घटना उघड झाली. सुधाकर देशमुख यांनी तातडीने ही माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांच्या निदर्शनास आणून याविषयी तक्रार केली. पोलिसांनी तातडीने या खात्याचा छडा लावून ते ‘ब्लॉक’ केले. ‘माझ्या नावे इन्स्टाग्राम आणि फेसबूक यांवर पैशांची मागणी करणार्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये’, असे आवाहन सुधाकर देशमुख यांनी सामाजिक माध्यमाद्वारे केले आहे.