नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही लागू करून हिंदु राष्ट्र घोषित करा ! – राष्ट्रीय शक्ती नेपाल

नेपाळ सरकारची चीनसमर्थित धोरणे पहाता तेथील हिंदु जनतेने देशात पुन्हा राजेशाही लागू करण्याच्या मागणीस आरंभ केला आहे. यासाठी त्यांनी दुचाकीफेरी काढून साम्यवादी पक्षाच्या के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विरोध केला.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून प्राणघातक आक्रमण

बजरंग दलाचे श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी  शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. आक्रमणामागील कारण समजू शकलेले नाही. श्री. नागेश हे गोरक्षण, धर्मांतर रोखणे आदी धर्मकार्यात आघाडीवर असतात.

छत्तीसगड येथील जामडीचे श्री पाटेश्‍वर धामाला (जिल्हा बालोद) संपूर्णपणे संरक्षण मिळावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राज्यपालांना निवेदन

राज्यपाल उइके यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या शिष्टमंडळाला या धामाचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन दिले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जाण्याची गोव्याने सिद्धता ठेवावी ! – डॉ. शिवानंद बांदेकर, डीन, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

डीन डॉ. शिवानंद बांदेकर पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत; मात्र कोरोनाची दुसरी लाट गोव्यात येऊ नये, यासाठी प्रत्येकाने कोरोनाची लक्षणे जाणवल्यास त्वरित उपाय करणे, आदींच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत.

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मांस विक्रीची अवैध दुकाने चालू, प्रशासनाकडून दुर्लक्ष

अवैध मांस विक्रेत्यांवर कारवाई न करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांचे कसायांशी आर्थिक संबंध आहेत का ? याविषयी शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी !

वैद्यांना शस्त्रकर्म करण्यासाठी दिलेली अनुमती रहित न केल्यास देशव्यापी आंदोलन करू ! – इंडियन मेडिकल असोसिएशनची चेतावणी

भारतीय वैद्यक परिषदेने आयुर्वेदीय वैद्यांना शस्त्रकर्म करण्यासाठी दिलेली अनुमती रहित न केल्यास महाराष्ट्रासह देशव्यापी आंदोलन करू, अशी चेतावणी इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे.

देवस्थान सहलीचे ठिकाण नसल्याने तिथे साधन-शुचिता पाळायलाच हवी ! – ब्राह्मण महासंघ महिला आघाडी, पुणे

मंदिरात दर्शनास येणार्‍या भाविकांनी वस्त्रसंहिता पाळावी, असे आवाहन शिर्डी देवस्थानद्वारे करण्यात आले आहे. हे अतिशय योग्य असून ब्राह्मण महासंघ महिला आघाडीचा या निर्णयास पूर्ण पाठिंबा आहे. देवस्थान सहलीचे ठिकाण नसल्याने तिथे साधन-शुचिता पाळायलाच हवी, असे स्पष्ट मत ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने व्यक्त केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार जाहीर

जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव; भारताला प्रथमच मिळाला मान

महाविकास आघाडी ५ वर्षे चालेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यशासनातील प्रत्येकजण समर्थपणे दायित्व निभावत असून हे शासन ५ वर्षे चालेल, असा विश्‍वास महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून वाचवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा !

हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून वाचवण्यासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, या मागणीसाठी २ डिसेंबर या दिवशी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोर्चा काढून प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले.