शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून प्राणघातक आक्रमण

भाजपच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर आक्रमण होणे, हिंदूंना अपेक्षित नाही !

बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते श्री. नागेश

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते श्री. नागेश यांच्यावर दीपक पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी  शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले.

यात गंभीररित्या घायाळ झालेल्या श्री. नागेश यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. या आक्रमणामागील कारण समजू शकलेले नाही. श्री. नागेश हे गोरक्षण, धर्मांतर रोखणे आदी धर्मकार्यात आघाडीवर असतात.