वैद्यांना शस्त्रकर्म करण्यासाठी दिलेली अनुमती रहित न केल्यास देशव्यापी आंदोलन करू ! – इंडियन मेडिकल असोसिएशनची चेतावणी

मुंबई – भारतीय वैद्यक परिषदेने आयुर्वेदीय वैद्यांना शस्त्रकर्म करण्यासाठी दिलेली अनुमती रहित न केल्यास महाराष्ट्रासह देशव्यापी आंदोलन करू, अशी चेतावणी इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. यासाठी ११ डिसेंबर या दिवशी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आणि कोरोना उपचार वगळता आरोग्य सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.