आजचे दिनविशेष

• नवसाला पावणार्‍या सोनुर्ली, सिंधुदुर्ग येथील श्री माऊलीदेवीचा जत्रोत्सव !
• माजगाव, सावंतवाडी येथील श्री स्वयंभू महादेवाचा जत्रोत्सव

लडाखमधील चीनचे बांधकाम ही चिथावणीखोर कृती ! – अमेरिकी सिनेटर राजा कृष्णमूर्ती यांची टीका

अमेरिकेचे सिनेटर असे उघडपणे बोलतात; मात्र भारतातील खासदार असे बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत !

चीन ब्रह्मपुत्र नदीवर प्रचंड मोठे धरण बांधणार !

ईशान्य भारतासह बांगलादेशमध्ये दुष्काळाची शक्यता ! चीनचे हे भारतावर एक प्रकारचे आक्रमणच आहे. अशा घटना रोखण्यासाठी भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे !

वेदांचे महत्त्व जगात पोचवणारे ब्राझिलचे जोनास मसेटी उपाख्य ‘विश्‍वनाथ’ !

विदेशी अन्य धर्मीय नागरिक भारतात येऊन वेदांचे शिक्षण घेऊन नंतर त्याच्या जगभरात प्रसार करतो, ही स्वधर्माविषयी अज्ञानी हिंदूंना चपराकच ! पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत स्वतःच्या महान धर्माकडे दुर्लक्ष करणारे हिंदु आतातरी जागे होतील का ?

वाराणसी येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत देवदिवाळी साजरी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर येथील ८४ घाटांवर १५ लाखांहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले.

कोल्हापुरात पारपत्र कार्यालय आजपासून चालू

कोरोना संक्रमणामुळे एप्रिलपासून पारपत्र कार्यालय बंद होते.  जानेवारी ते मार्च या तीन मासांत ७ सहस्र पारपत्रांच्या कामांची पूर्तता झाली होती; मात्र दळणवळण बंदीमुळे पुढील प्रक्रिया बंद होती.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची आमदार सुधीर गाडगीळ जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट !

सातारा येथील भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ३० नोव्हेंबर या दिवशी सांगली येथील भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे मानसिक आरोग्य पडताळण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा शासनाचा आदेश

राज्यातील प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची मानसिक पडताळणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी आधुनिक वैद्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही पडताळणी कशा प्रकारे करावी, याविषयीचा अहवाल या समितीने नुकताच शासनाकडे सादर केला आहे.