तुर्कस्तान पाकला साहाय्य करण्यासाठी सीरियातील आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवण्याच्या प्रयत्नात ! – ग्रीसच्या पत्रकाराची माहिती

पाकला आतापर्यंत नष्ट न केल्याचा हा परिणाम आहे ! अन्य इस्लामी देशांकडून पाकला अशा प्रकारचे साहाय्य मिळण्यापूर्वीच त्याला आता नष्ट करणेच आवश्यक !

प्रदूषण नियंत्रण मंडळाला कायद्याची बाराखडीही ठाऊक नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालयाने फटकारले

ध्वनीवर्धकातून निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक प्रमाणात ध्वनी येत असल्याच्या प्रकरणी आरोपीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई न केल्याने कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि अधिकारी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने फटकारले आहे.

धर्मांतराचे षड्यंत्र करणार्‍यांना तोडून टाकू ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून हिंदूंना हेच अपेक्षित आहे !

कोरोनाच्या बनावट लसीची विक्री करण्यासाठी गुन्हेगारी जगत सक्रीय होण्याची शक्यता ! – इंटरपोलची चेतावणी

लवकरच जगातील विविध देशांमध्ये कोरोनावर लस येण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लसीकरणला प्रारंभही होणार आहे.

उत्तरप्रदेशमध्ये दांदूपूर रेल्वे स्थानकाचे नाव आता ‘माँ बाराही देवी धाम’ होणार

राज्यातील लक्ष्मणपुरी ते वाराणसी या मार्गावरील प्रतापगड-बादशाहपूरच्या मधे असणार्‍या दांदूपूर रेल्वे स्थानकाचे नाव पालटून आता ‘माँ बाराही देवी धाम’ असे करण्यात येणार आहे.

दोषी लोकप्रतिनिधींवर आजीवन बंदी घालण्याचा नियम नाही ! – केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

राजकारण्यांनी कितीही गुन्हे करून शिक्षा भोगली, तरी ते पुन्हा राजकारणात येऊ शकतात, हे भारतियांना लज्जास्पद !

काही आठवड्यांत कोरोना लसीचे संशोधन पूर्ण होईल ! – पंतप्रधान मोदी

सध्या जगभरात विविध आस्थापने कोरोनावरील लस वितरित करतांना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने अधिक आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पहात आहे. त्यामुळे जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेही आहे.

भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘विविधतेला जोडणारा घटक केवळ भारताजवळच असून आम्हाला तो जगाला द्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

पतंजलि, डाबर, झंडू, बैद्यनाथ आदी १३ मोठी आस्थापने मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकतात ! – सी.एस्.ई.चा दावा

पतंजलि आणि डाबर यांनी या चाचणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पतंजलि चे म्हणणे आहे की, नैसर्गिकरित्या मध बनवणार्‍या आस्थापनांच्या अपकीर्तीचा हा प्रयत्न आहे !, तर डाबर चे म्हणणे आहे की, जो अहवाल समोर आला आहे, तो प्रायोजित आहे !

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी.एम्. कर्णन यांना अटक

सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांचे काही न्यायाधीश महिला अधिवक्त्यांचा अन् न्यायालयातील महिला कर्मचार्‍यांचा लैंगिक छळ करतात, असा आरोप केल्याच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी.एम्. कर्णन यांना येथील पोलिसांनी अटक केली.