आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून कंगना राणावत आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग सादर

अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या धाडीमध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे खोटे वृत्त प्रसिद्ध झाले.

अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला मुदतवाढ देण्यास विरोधकांचा विरोध

कंगना राणावत आणि अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात विशेषाधिकार दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी सभागृहाबाहेर अडवले !

विश्‍वासघात करून सत्तेत आलेले सरकार महाराष्ट्रातील गोरगरिबांशी खेळत आहे.

पोलिसांवर हात उगारणार्‍या महिला आणि बाल विकासमंत्र्यांनी त्यागपत्र द्यायला हवे होते ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

महिला आणि बाल विकास यशोमती ठाकूर यांनी थेट पोलिसावरच हात उगारला.

शेतकरी आंदोलन पंजाब आणि हरियाणा राज्यांतील उच्च दर्जाचे दलाल चालवत आहेत !  

पंजाब आणि हरियाणा राज्यांतील उच्च दर्जाचे दलाल नियोजित पद्धतीने शेतकरी आंदोलन चालवत आहेत. साम्यवादी विचारसरणीचे लोक आणि ‘टुकडे – टुकडे गँग’ यामध्ये सहभागी झाली असून शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे

विधानसभेतील अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला मुदतवाढ

सभागृहाच्या कामकाजात हस्तक्षेप झाला, तरच हक्कभंग करता येतो. शासनाला हक्कभंगाची व्याप्ती वाढवायची असल्यास वाढवता येईल; मात्र एखाद्या प्रकरणासाठी कायदा अस्तित्वात असतांना त्यासाठी हक्कभंग आणून सभागृहाचा वेळ घालवणे योग्य नाही.

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन

कोविड सेंटरमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने मृत झालेले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या वडिलांचेही कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. पत्रकार रायकर यांचे निधन झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेले साहाय्य अद्यापही मिळाले नसल्याचे सांगत मराठी पत्रकार परिषदेने संताप व्यक्त केला आहे.

योगासनाच्या माध्यमातून देशातील मुलांचे शरीर आणि संकल्प दृढ करणे हे राष्ट्रकार्य घडणार ! – योगऋषी स्वामी रामदेव

नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनच्या वतीने संगमनेर येथील ३ दिवसांच्या योगासन परीक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या ऑनलाईन उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

कोटी कोटी प्रणाम !

• ज्ञानयोगी, कृपावत्सल परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांची आज जयंती
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली येथील नवसाला पावणारा प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा आज जत्रोत्सव !
• कवळे, फोंडा येथील श्री कपिलेश्‍वर महारुद्र पंचायतन देवस्थानचा आज जत्रोत्सव !

कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी सापडलेले अर्धा किलो सोने सरकारजमा !

हिंदूंच्या मंदिरांच्या सोन्यावर सरकारचा काय अधिकार ? मशीद किंवा चर्चच्या संपत्तीवर सरकार कधी असा अधिकार गाजवते का ? अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी आणि हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात रहाण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !