खासदारांच्या वेतनात वर्षभर ३० टक्के कपात

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी खासदारांच्या वेतनामध्ये वर्षभर, म्हणजे आर्थिक वर्ष २०२०-२१ या कालावधीसाठी ३० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

तबलीगी जमातचे आतंकवादी संघटनांशी संबंध !

तबलीगी जमातच्या पाकिस्तान आणि बांगलादेश येथील शाखांचे हरकत उल् मुजाहिदीन, हरकत उल जिहाद अल इस्लामी, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनांशी संबंध होते.

आपल्याला कोरोनाविरुद्धची मोठी लढाई जिंकून पुढे जायचे आहे ! – पंतप्रधान मोदी

कोरोनाविरुद्धची लढाई मोठी आहे. आपण त्यासाठी सज्ज आहोत. आपल्याला ही लढाई जिंकून पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांना एका व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करतांना केले.

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील पोस्टमनला कोरोना झाल्याने सहस्रो लोकांचे घरीच अलगीकरण

एका पोस्टमनला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर शहरातील सहस्रो लोकांना घरातच अलगीकरणात रहाण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे.

चीनमधील मांस बाजारावर कारवाई करा ! – ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी

चीनमधील मांस बाजारातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रे यांच्याकडे या बाजारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आतंकवाद्यांशी संबंध असणार्‍या तबलीगी जमातवर बंदी घाला ! – विश्‍व हिंदु परिषदेची मागणी

तबलीगी जमात ही संघटना कट्टरतावाद आणि आतंकवाद यांचे पोषण करणारी आहे. या संघटनेमुळेच देशात कोरोनाचा प्रसार झाला आहे. या संघटनेचे सदस्य आत्मघातकी लोकांप्रमाणे कोरोनाचा प्रसार करत आहेत.

तबलीगी जमातमुळे पाकमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव

२० सहस्र तबलीगींचे विलगीकरण

तबलीगी जमातच्या विरोधातील षड्यंत्र बंद केले नाही, तर वार्ताहरांना फिरू देणार नाही ! – मौलाना अली कादरी यांची प्रसारमाध्यमांना उघड धमकी

तबलीगी जमातच्या विरोधात षड्यंत्र रचण्यात आले आहे. हे षड्यंत्र वृत्तवाहिन्यांच्या माध्यमांतून पूर्ण केले जात आहे.

जगाने चीनवर राजकीय आणि आर्थिक बहिष्कार घालावा ! – योगऋषी रामदेव बाबा

कोरोना विषाणूंचा प्रसार केल्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवर राजकीय आणि आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे आणि भारताने यासाठी मुत्सद्दीपणा दाखवला पाहिजे, अशी मागणी योगऋषी रामदेव बाबा यांनी ट्वीट करत केली आहे.

कटक (ओडिशा) येथे मशिदीबाहेर गर्दी केलेल्या धर्मांधांकडून पोलिसांवर दगडफेक

दळणवळण बंदी असतांनाही येथील केशरपूरमधील मशिदीबाहेर मोठ्या संख्येने मुसलमान एकत्र आल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस येथे पोचले असता त्यांच्यावर जमावाकडून दगडफेक करण्यात आली.