‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घाला ! – गोवा सुरक्षा मंच

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी ‘गोवा सुरक्षा मंच’चे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. श्री. नितीन फळदेसाई या पत्रकात पुढे म्हणतात, ‘‘बाबरी मशीद पुन्हा बांधली जाणार’, अशा अशायाचे फलक ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही आतंकवादी संघटना गोव्यात कशी लावू शकते ?

मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह ‘ट्वीट’ केल्याप्रकरणी लोकशाही असलेल्या अन्य देशांत काय कारवाई होते ? याची माहिती द्या !

लोकशाही असलेल्या अन्य देशांत तेथील नागरिकांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट किंवा ‘ट्वीट’ केले, तर तेथे काय कारवाई करण्यात येते ? याची माहिती द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला दिले आहेत.

लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद

लालबाग येथील सिलिंडरच्या स्फोटप्रकरणी मंगेश राणे आणि त्यांचा मुलगा यश यांच्या विरोधात काळाचौकी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.

प्रताप सरनाईक यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण, सूडबुद्धीने कारवाई न करण्याचे निर्देश

शिवसेनेचे आमदार प्रतापसिंह सरनाईक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर सध्या कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला संरक्षण दिले आहे. ‘कोणतीही कारवाई सूडबुद्धीने करू नये’, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

८ कोटी रुपयांच्या उद्यान घोटाळ्यातील ३ अधिकारी निलंबित

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ८ कोटी रुपयांच्या उद्यान घोटाळ्यातील ३ अधिकार्‍यांना निलंबित करून कंत्राटदारांचे कंत्राट रहित केले आहे.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी !

पृथ्वीवरील भूमीमध्ये भाजीचे उत्पादन घेण्यात येते, तसे आता अवकाशातही भाज्यांचे उत्पादन घेण्यास चालू झाले, तर आश्‍चर्य वाटणार नाही, अशी घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली आहे.

कर्तव्यावर नसणार्‍या ८ वैद्यकीय अधिकार्‍यांना आयुक्तांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये कामावर अनुपस्थित असणार्‍या ८ वैद्यकीय अधिकार्‍यांना महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कोटी कोटी प्रणाम !

• सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा आज महानिर्वाण उत्सव, कांदळी, पुणे.
• मडकई येथील श्री नवदुर्गादेवीचा आज जत्रोत्सव !

पाकिस्तान, चीन यांच्यासहित १० देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी ! – अमेरिका

अखेर अमेरिकेला जगातील कोणत्या देशांत धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी होते, हे लक्षात आले, हे बरे झाले ! पाकमध्ये गेली ७ दशके हिंदूंवर अत्याचार होत असल्याने त्यांचे अस्तित्वच नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे.

देशभरातील शेतकर्‍यांचा बंद शांततेतच !

‘बंद’ म्हणजे स्वतःच्या मागण्यांसाठी देश आणि जनता यांना वेठीस धरून त्यांची सहस्रो कोटी रुपयांची हानी करणारा गुन्हाच होय ! अशा प्रकारे हानी करणे जनताद्रोहच होय ! सरकारनेही कुणावर अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याकडे लक्ष द्यायला पाहिजे !