कोल्हापूर डीस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वतदिन साजरा !

कोल्हापूर डीस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशन आणि त्यांच्याशी  संलग्न ७४ संस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वतदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक डोंगर शिखरांवर आरोहण आणि पर्वत पूजन आयोजित करण्यात आले होते.

मागील आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची केंद्र सरकारला आंदोलनाची चेतावणी

दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला आंदोलनाची चेतावणी दिली आहे.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कृषी सुधारणा विधेयक पुस्तिकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

कृषी सुधारणा विधेयक २०२० या कायद्यात शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिकदृष्ट्या उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत

अमरावती येथे आधुनिक वैद्यांच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन

‘डॉक्टर म्हणजे रुग्णांचे देवच असतात. कोरोनाचा उदय कसा झाला, हे प्रगत विज्ञानालाही शोधता आलेले नाही; म्हणून आपण प्रत्येकानेच साधना करणे आवश्यक आहे’,

‘भामा-आसखेड’च्या पाण्यावरून जलसंपदा आणि महापालिका यांच्यात वाद होण्याची शक्यता

भामा-आसखेड योजना कार्यान्वित झाल्यानंतर खडकवासला धरणातून महापालिकेला दिल्या जाणार्‍या पाणी कोट्यात २.६४ टीएम्सीने कपात केली जाईल

सर्व धर्मियांसाठी एकाच आधारावर घटस्फोट देण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

आंतरराष्ट्रीय करार आणि भारतीय राज्यघटना यांचा सन्मान करत देशातील सर्व नागरिकांसाठी घटस्फोट एकाच आधारावर देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका भाजपचे नेते असलेले अधिवक्ता अश्‍विनीकुमार उपाध्याय यांनी अधिवक्ता पिंकी आनंद यांच्याद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली.

सरकार, शेतकरी संघटना आणि पक्ष यांची समिती बनवा !

आतापर्यंत यावर तोडगा का निघू शकला नाही ? केवळ सरकारच्या स्तरावर हा प्रश्‍न सुटेल असे वाटत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आंदेलनावर केंद्र सरकारला सुनावत समिती स्थापन करण्याचा पर्याय सुचवला आहे.

(म्हणे) ‘मुसलमानांसाठी भारत धोकादायक आणि हिंसक !’ – दक्षिण आशिया स्टेट ऑफ मायनॉरिटीजचा अहवाल

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! काश्मीरमधून हिंदूंचा वंशसंहार कुणी केला ?, तसेच अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश येथे हिंदू पुढे औषधालाही शिल्लक रहाणार नसतांना त्याविषयी ही संघटना आंधळी, बहिरी आणि मुकी का आहे ?

दारूबंदी असून बिहारमधील पुरुष दारू पिण्यात देशात पुढे !

दारूबंदी असतांनाही तेथील पुरुषांना दारू मिळतेच कशी ? अशा प्रकारे दारू पिण्यात बिहार पुढे असणे, हे तेथील शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांना लज्जास्पदच होय !