हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ऑनलाईन तीन दिवसीय प्रथमोपचार शिबीर पार पडले !

शिबिरात गंभीर स्थितीतील रुग्णाच्या जीवितरक्षणासाठी करावयाच्या कृती, भाजणे आणि पोळणे, विजेचा धक्का लागणे, वीज कोसळणे आदी प्रसंगात नेमकी कोणती काळजी घ्यावी ?अशा प्रात्यक्षिक विषयांवर तज्ञांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

माहूरगड येथील दत्त जयंती यात्रा रहित

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून श्री दत्तमंदिर परिसराचे प्रवेशद्वार २९ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

दैनिक ‘जनशक्ती’चे संपादक तथा उद्योजक कुंदन ढाके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन

दैनिक ‘जनशक्ती’ आणि दैनिक ‘लेवाशक्ती’चे संपादक कुंदन दत्तात्रय ढाके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आजचा दिनविशेष : काश्मिरी हिंदुंचा ‘होमलॅण्ड डे’

आज काश्मिरी हिंदुंचा ‘होमलॅण्ड डे’

(म्हणे) ‘मी चाकूद्वारे पंतप्रधान मोदी यांना मारेन !’ – शेतकरी आंदोलनामधील एका महिलेची धमकी

शेतकरी आंदोलन कोणत्या दिशेने जात आहे, हेच यातून लक्षात येते ! सरकारने अशांना शोधून त्यांच्यावर तात्काळ  कारवाई करणे आवश्यक आहे आणि याप्रकरणी शेतकरी संघटनांनीही स्पष्टीकरण द्यायला हवे !

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधाचे अवैध घर पालिकेकडून उद्ध्वस्त !

हे घर बांधेपर्यंत पोलीस आणि नगरपालिका यांचे अधिकारी झोपले होते का ? जर या घरावरून दगडफेक झाली नसती, तर पोलीस आणि नगरपालिका यांनी अशी कारवाई केली नसती ! अवैध घरांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांची हत्या कि आत्महत्या याच्या अन्वेषणाचे निष्कर्ष घोषित करावेत ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या अन्वेषणास प्रारंभ करून आता जवळपास ५ मास झाले आहेत; मात्र त्याची हत्या झाली होती कि त्याने आत्महत्या केली ? याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही.

नेपाळमध्ये स्वतःची बाजू पुन्हा भक्कम करण्यासाठी चीनचे ४ नेते नेपाळमध्ये !

चीनची प्रत्येक चाल उधळून लावण्यासाठी भारताने प्रयत्न केला पाहिजे !

उत्तरप्रदेशात जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई

एकीकडे सर्व राजकीय पक्ष जातपात नष्ट करण्याची भाषा करतात; मात्र दुसरीकडे जातीचे राजकारण खेळत अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात !

हिंदु धर्माची बाजू मांडणारे दैनिक ‘सनातन प्रभात’सारखे दुसरे दैनिक होणे नाही ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण केव्हापासून चालू होणार आहे ? हिंदु धर्माची बाजू मांडणारे असे दैनिक दुसरे होणे नाही, असे गौरवोद्गार श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी काढले.