ऊस वाहतूकदार टोळी मुकादमांवर गुन्हे नोंद करा ! – आमदार प्रकाश आबिटकर

मराठवाडा आणि विदर्भातील ऊस मजूर मुकादम यांच्याकडून जिल्ह्यातील ऊस वाहतुकदार मालकांची प्रतिवर्षी लाखो रुपयांची फसवणूक  होते. त्यामुळे या टोळी मुकादमांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली.

मुंबईत ‘नाइट क्लब’च्या मालकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास संचारबंदी ! -इक्बालसिंह चहल, आयुक्त, महापालिका

मौजमजा करण्याच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात नियम न पाळता एकत्रित आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल.

(म्हणे) ‘केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना घरात घुसून चोप द्यावा लागेल !’

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी लोकप्रतिनिधीविषयी अशी भाषा वापरणे अशोभनीय !

शहापूर येथे १३ डिसेंबर या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन

शहापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि डी. वाय. फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वाहतुकीचा नियम चौथ्यांदा मोडल्यास ६ मासांसाठी अनुज्ञप्ती रहित होणार !

वाहतूक विभागाकडून ‘वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे. रस्त्यावर पोलीस नाहीत, हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये’, असे आवाहन केले आहे.

मुंबई येथे घायाळ युवकाला रुग्णालयात नेण्यास नकार देणार्‍या टॅक्सीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद

३ टॅक्सीचालकांना पोलिसांनी विनंती करूनही त्यांनी घायाळ अवस्थेत पडल्याचे आढळूनही रावत यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला.

आमदार अरुणअण्णा लाड यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण अण्णा लाड यांनी विधानभवनात विधान परिषद सदस्यत्वासमवेत गोपनियतेची शपथ घेतली.

प्रभाग क्रमांक १६ मधील रेवणी रस्त्यावरील फायर स्टेशनच्या जागेवरच नवीन अत्याधुनिक फायर स्टेशन बांधा !

फायर स्टेशन आयुक्तांच्या आदेशाने स्टेशन चौक येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. या जागेवर प्रशासन काय करणार आहे ?

ठाणे येथे ८५ लाख ४८ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत, तिघांना अटक

बनावट चलनी नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या सचिन आगरे याला कापूरबावडी परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यात ४७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार

बेळगाव जिल्ह्यात ४७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५९ ग्रामपंचायतींची, तसेच दुसर्‍या टप्प्यात २१८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.