Bijapur Naxal Encounter: बिजापूर (छत्तीसगड) येथे ३१ नक्षलवादी ठार, तर २ सैनिकांना वीरमरण
बिजापूर येथील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले. त्याच वेळी २ सैनिकांना वीरमरण आले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.