छत्तीसगडमध्ये शाळांमध्ये भ्रमणभाषबंदीची कडक कार्यवाही होणार

राज्यातील शाळांमध्ये इयत्ता बारावीपर्यंत भ्रमणभाष वापरण्यास बंदी आहे; मात्र त्याचे उल्लंघन करत विद्यार्थी सर्रासपणे भ्रमणभाष वापरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष विचलित होते.

आता काँग्रेसशासित छत्तीसगड राज्यातही सीबीआयला पूर्वानुमतीविना प्रवेशबंदी

तृणमूल काँग्रेस आणि आंध्रप्रदेश या राज्यांनंतर आता काँग्रेसशासित छत्तीसगड राज्य सरकारनेही सीबीआयला राज्यात पूर्वानुमतीविना प्रवेशबंदी केली आहे. सीबीआयला प्रवेशबंदी करणे म्हणजे गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी मोकळीक देणे !

छत्तीसगडमधील काँग्रेसच्या मंत्रीमंडळात अशिक्षित मंत्र्याचा समावेश

छत्तीसगडच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील ९ मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. या सर्वांना राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शपथ दिली. यात कवासी लखमा हे शपथ वाचू शकले नाहीत. त्यामुळे राज्यपाल सांगत होत्या, तसे लखमा म्हणत होते.

(म्हणे) ‘बंदुकीचा वापर हा नक्षलवादाची समस्या रोखण्यावरील उपाय नाही !’ – काँग्रेसशासित छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

नक्षलवादाच्या विरोधात स्वत: काही करायचे नाही आणि इतरांनाही काही करू द्यायचे नाही, हे काँग्रेसचे धोरण असल्यामुळे आता राज्यात नक्षलवाद फोफावल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

मध्यप्रदेशनंतर छत्तीसगडमध्येही काँग्रेसकडून शेतकर्‍यांना कर्जमाफी

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यानंतर काँग्रेसशासित छत्तीसगड सरकारनेही शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली.

भूपेश बघेल छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाविषयी गेल्या ५ दिवसांपासून चालू असलेली निवडप्रक्रिया संपली असून मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना कसरत करावी लागली.

दंतेवाड्यात ८ नक्षलवाद्यांना अटक

येथील किरंदूल भागात ३० नोव्हेंबरला सकाळी सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये सैनिकांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला, तसेच ८ नक्षलवाद्यांना अटक केली. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

माओवाद्यांच्या केंद्रीय नेतृत्वात खांदेपालट

गेल्या १३ वर्षांपासून पक्षाच्या प्रमुखपदी असलेला मुपल्ला लक्ष्मण राव उपाख्य गणपति याने त्यागपत्र दिले असून त्याच्या जागी जहाल नक्षलवादी नंबाल्ला केशव राव उपाख्य बसवराजू याची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते अभय याने एका पत्रकाद्वारे दिली.

छत्तीसगडमध्ये ९ नक्षलवादी ठार, तर २ सैनिक हुतात्मा

येथे सुरक्षा सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ९ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. या चकमकीत २ सैनिक हुतात्मा झाले.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची ८ धर्मग्रंथांवर हात ठेवून भाजपला पाठिंबा न देण्याची शपथ !

‘मी मरण पत्करीन; पण फॅसिस्टवादी आणि जातीयवादी भाजपला पाठिंबा देणार नाही’, अशी शपथ काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले आणि ‘जनता काँग्रेस’ नावाचा पक्ष स्थापन केलेले अजित जोगी यांनी ८ धर्मग्रंथांवर हात ठेवून घेतली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now