
रायपूर (छत्तीसगड) – मध्यप्रदेशाचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी रायपूर विमानतळावर राहुल गांधी यांच्याविषयी म्हटले की, एक गांधी देशातील गरिबांसाठी कपडे काढून जगत होते. ते बकरीचे दूध पित असत. हे गांधी (राहुल गांधी) सुटीसाठी थायलंडला जातात. ते गांधी गायीची पूजा करायचे. हे गांधी गोमांस भक्षण करतात.
कैलाश विजयवर्गीय यांनी छत्तीसगड काँग्रेस समितीचे अध्यक्ष दीपक बैज यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख ‘गांधी की आंधी है’ (गांधींचे वादळ) असा केला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना विजयवर्गीय यांनी वरील विधान केले. रायपूर विमानतळावर बोलतांना विजयवर्गीय म्हणाले की, दीपक बैज कोणत्या गांधींविषयी बोलत आहेत ? ते गांधी जे देशासाठी जगले कि ते गांधी जे हिंदी नीट लिहूही शकत नाहीत.
कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले की, हे गांधी देशासाठी नकारात्मक आहेत. राहुल गांधी ज्या पद्धतीने विदेशात जाऊन भारताविरुद्ध विधाने करतात, ते दुर्दैवी आहे.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक