Holy Cross Nursing College Chhattisgarh : जशपूर (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या महाविद्यालयात विद्यार्थिनींवर आणला जातो ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव

हिंदु संघटनांकडून विरोध

जशपूर (छत्तीसगड) – जशपूर जिल्ह्यातील होली क्रॉस मिशनरी नर्सिंग महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जातो. जर त्या विद्यार्थिनी सहमत नसतील, तर त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यासह अन्य मार्गांनी त्रास दिला जतो, असे समोर आले आहे.

१.  येथे नर्सिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीने प्राचार्या विन्सी जोसेफ यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनी म्हणते की, नर्गिंगच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतल्यानंतर ३ महिन्यांनी प्राचार्याने तिला बोलावले आणि हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला.

२. जेव्हा विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले, तेव्हा प्रस्तावाचे रूपांतर दबावात झाले. प्राचार्य विन्सी तिला वारंवार धर्मांतर करून नन बनण्यास सांगत होत्या. जेव्हा विद्यार्थिनीने हे करण्यास स्पष्ट नकार दिला, तेव्हा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने तिला त्रास देणे चालू केले.

३. विद्यार्थिनीने सांगितले की, तिला वर्गातून बाहेर काढण्यात आले. तिला महाविद्यालय परिसरामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर १ एप्रिल २०२४ या दिवशी तिला वसतीगृहातून काढून टाकण्यात आले. तिला अभ्यास करण्यापासून आणि वार्षिक परीक्षेला बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.

४. जेव्हा विद्यार्थिनीने याविषयीवरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार केली, तेव्हा तिला परीक्षेला बसण्याची अनुमती देण्यात आली; परंतु तिला प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याची धमकी देण्यात आली.

५. आता या संपूर्ण प्रकरणावर विद्यार्थिनीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

हिंदु संघटनांकडून महाविद्यालय बंद करण्याची मागणी  

विद्यार्थिनीच्या मानसिक छळावरून छत्तीसगडमधील भाजपचे नेते आणि अखिल भारतीय घर वापसी संघटनेचे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही. होली क्रॉस नर्सिंग कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीला त्रास देणार्‍या आणि धर्मांतर करणार्‍यांना अजिबात सोडले जाऊ नये. संबंधित मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई करावी आणि त्या संस्थेची मान्यता रहित करावी.

विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा प्रमुख कर्नल सिंह यांनी एका गरीब हिंदु मुलीचे धर्मांतर केल्याच्या आरोपांवर तात्काळ कारवाई करण्याची आणि महाविद्यालय बंद करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

या देशात ख्रिस्ती मिशनर्‍यांवरच आता बंदी घालण्याची वेळ आली आहे. जर असे आता केले नाही, तर पुढील काही वर्षांत भारतावर हिंदूंचे नाही, तर इस्लाम आणि ख्रिस्ती यांचेच राज्य येईल !